महाप्रसादे गोविन्दे नाम-ब्रह्मणि वैष्णवे।
स्वल्पपुण्यवतां राजन् विश्वासो नैव जायते ॥ ||
१
||
शरीर अविद्या जाल, जडेन्द्रिय ताहे काल,
जीवे फैले विषय-सागरे ।
तार मध्ये जिह्वा अति, लोभमय सुदुर्मति,
ताके जेता कठिन संसारे ॥ ||
२
||
कृष्ण बड दयामय, करिबारे जिह्वा जय,
स्वप्रसाद-अन्न दिला भाइ ।
सेइ अन्नामृत पाओ, राधाकृष्ण-गुण गाओ,
प्रेमे डाक श्री चैतन्य निताई ॥
३
||
जय निमाई जय निताई ||
(जय) श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानंद ।
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद ॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ॥
हे भगवंता, हे भौतिक जग अंध:कारमय स्थान आहे आणि आपले इंद्रियतृप्तीचे जाळे नेहमी आपल्याला मृत्यूकडे खेचून नेत आहे.
तसेच आम्ही काही कारणास्तव या भौतिक भवसागरात इंद्रियतृप्तीत खितपत पडलो आहोत, आणि सर्व इंद्रियांमध्ये जिह्वेवरती नियंत्रण मिळविणे अतिशय कठीण आहे.
परंतु, हे कृष्ण तुम्ही कृपाळूपणे आम्हाला प्रसाद देऊन, जिभेवरती नियंत्रण ठेवण्यास सहाय्य करता, त्यामुळे आम्ही हा प्रसाद भरपूर ग्रहण करून राधाकृष्ण यांचा गौरव करीत श्रीचैतन्य महाप्रभू आणि श्रीनित्यानंद प्रभू यांना सहाय्यासाठी साद घालतो.
टीप: एकादशीच्या दिवशी केवळ पहिला मंत्र म्हणावा.