मराठी भाषेतील सत्संग - अध्यात्मिक प्रगतीसाठी मंदिराचे विविध कार्यक्रम

इस्कॉन श्री गोविंद धाम, रावेत येथे आम्ही मराठी भाषेत आध्यात्मिक प्रवचने आयोजित करतो. ही प्रवचने मंदिराच्या आवारात आयोजित केली जातात. प्रवचने वैदिक साहित्याचे (श्रवण) विशेषत: भगवद्गीता, श्रीमद्भागवत आणि श्री चैतन्य चरितामृत यांच्या शिकवणी प्रस्तुत करून प्रत्येकाचे जीवन सखोलरित्या अध्यात्मिक बनवतात. येथे खालील तक्त्यात, सत्संगाचा पद्धतशीर कार्यक्रम दर्शविला आहे.


3 दिवसीय / 1 दिवसीय श्रीमद्भगवद्गीता वर्ग
श्रीमद्भगवद्गीता वर्ग

भगवद्गीतेच्या तत्त्वांवरील 3 दिवसीय अथवा 1 दिवसीय सत्रांचा अभ्यासक्रम. शांतता, आनंद आणि जीवनाच्या परम उद्देशासाठी आपल्या शोधाची जिज्ञासा शमवण्यासाठी अत्यंत समर्पक प्रस्तुती. भगवद्गीतेच्या शिकवणीवर आधारित आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी हा प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे. आत्म-साक्षात्काराच्या दिशेने असलेल्या वास्तविक आध्यात्मिक तत्त्वांचा एक व्यापक दृष्टीक्षेप याद्वारे प्राप्त होतो.

या संदर्भात अधिक जाणून घ्या
1 वर्ष मंथन सत्संग
मंथन - आध्यात्मिक विचारांची प्रक्रिया

मंथन सत्संग कार्यक्रम म्हणजे अध्यात्मिक प्रशिक्षणाने एक विशुद्ध सद्विचारांची सुरुवात. तुमच्या आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या मदतीने धर्मग्रंथातील आध्यात्मिक तत्त्वांचा अनुभव घेणे. अध्यात्मिक जीवनशैलीचे अनुसरण करण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी परिसंवादांसह एक वर्षाचा सखोल आध्यात्मिक अनुभव. असे विषय जे जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात सहजतेने प्रगती करण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे.. या मध्ये 60 पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे (सूची पाहण्यासाठी क्लिक करा)

या संदर्भात अधिक जाणून घ्या
अध्यात्मिक साधनेत स्थित होणे गोविंद वृक्ष
गोविंद वृक्ष - अध्यात्मिक मार्गदर्शन (Mentor System)

साधनेसाठी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आध्यात्मिक मार्गदर्शक आवश्यक असतो. तो एक मैत्रीपूर्ण मार्गदर्शकासारखा असतो जो साधकाला त्याच्या जीवनशैलीचे नियमन करण्यास आणि साधनेची पातळी - वैयक्तिक आध्यात्मिक जीवनशैली जोपासण्यास मदत करतो.

साधना आणि सेवा यामध्ये विशेष लक्ष गोविंद सभा
गोविंद सभा - आध्यात्मिक समुपदेशक (Spiritual Counsellor) व्यवस्था

आध्यात्मिक तत्त्वांचे यथायोग्य पालन करून साधनेचे एक सुव्यवस्थित नियमन राखण्यासाठी, एखाद्याच्या सेवांमध्ये वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आध्यात्मिक सल्लागाराची आवश्यकता असते. समुपदेशक हा आध्यात्मिक गुरुच्या प्रतिनिधीसारखा असतो जो साधकाला भक्तीमय सेवेच्या व्यावहारिक शरणागतीशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि मदत करतो.

मराठी मधील सत्संग -अधिक माहितीसाठी सम्पर्क: श्री मूळराम प्रभू: 8888308750
Whatsapp for help


Visit Count #
23,41,745
© ISKCON Ravet | All Rights Reserved | SW Version 2.2