Skip Navigation LinksHome > Back To Godhead Magazine
संकलन: श्री जडभरत प्रभू
मासिक पत्रिकेविषयी - व्हिडिओ
धर्मरक्षा -पुलवामा शहीद जवान
धर्मरक्षा आणि संस्कृतीरक्षा प्रकल्प - पुलवामा शहीद जवान
मासिक प्रारंभ करण्यापाठीमागे कारण
  • श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती यांची पाश्चात्य देशात प्रचार करण्याची आज्ञा आणि ग्रंथ छापण्याची आज्ञा- श्रील प्रभुपाद नेहमी चिंतन करित - प्रयत्न - देश गुलामगिरीमध्ये - इंग्रजांचे भारतीय जनतेवर अत्याचार - कलकत्त्यावरती जपानद्वारे बाँबवर्षाव - जनता होरपळली जात -भारतामध्ये तिव्र दुष्काळ - जनता उपासमारिने - जनतेचे हे दु:ख श्रील प्रभुपाद जवळुन पाहत - ह्दयामध्ये - पिडेने करूणा उत्पन्न -अशा संकटपूर्ण परिस्थितीत कृष्णभावनेच्या प्रचाराची खुप गरज -गौडीय मठाद्वारे चालविली जाणारी वृतपत्रे ‘‘ नादिया प्रकाश व हारमोनिस्ट ’’ ही बंद - अशा परिस्थितीमध्ये दु:ख व पिडेने त्रासलेल्या जनतेस ते काही सांगु इच्छीत होते, एक प्रभावशाली कार्यासाठी त्यांचे मन ओढ घेऊ लागले. यातुन एका अशा साहित्याची गरज त्यांना वाटु लागली की ज्याद्वारे ते या संसारातील समस्या आपल्या आध्यात्मिक गुरू प्रमाणे निर्भिड भाषेत मांडु शकतील.
  • ६, सिताकांत बॅनर्जी येथील आपल्या खोलीत बसुन श्रील प्रभुपाद विचार- लिखान व पांडुलिपीमध्ये एका पत्रिकेसाठी ते टाईप करित. एका पानाच्या वरिल भागावर त्यांनी एक चौकोनात शब्दचित्र बनविले वरील डाव्या भागामध्ये दैदिप्यमान सुर्यकिरणामध्ये भगवान चैतन्य महाप्रभु यांचे चित्र - ऊजविकडे संपूर्ण अंधारात बुडालेला जनसमुदाय आहे जो चैतन्य महाप्रभुंकडुन प्रकाश प्राप्त करू इच्छीत आहे. भगवान चैतन्य महाप्रभु आणि अंध:कारात बुडालेला जनसमुदाय यांच्यामध्ये पत्रिकेचे नाव ‘‘ बॅक टु गॉडहेड ’’ एका झेंड्याप्रमाणे फडफडत होते. खाली ऊजव्या कोप-यात लेखन मुद्रेमध्ये श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती यांचे चित्र होते जे विचारमग्न होऊन वर पाहत होते. शब्दचित्राच्या वरती एक ब्रिद वाक्य अंकित होते - ‘‘ कृष्ण सुर्यासमान, माया आहे अंध:कार. जेथे कृष्ण तेथे नाही मायेचा अधिकार.’’
  • श्रील प्रभुपाद यांचे गुरू श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती यांनी आपल्या तिरोभावाच्या दोन दिवस पुर्व एक पत्र त्यांना लिहले, त्यामध्ये त्यांना इंग्रजीमधुन प्रचाराची आज्ञा दिली श्रील प्रभुपाद म्हणतात - सन १९३६ पासुन आत्तापर्यंत की केवळ याच विचारात असे की माझ्याकडे कोणतेही साधनही नाही व माझी क्षमता ही नाही तर मी या कठिन कार्यास कसा प्रारंभ करू ? परंतु मी हे करू शकलो कारण मला कोणी निरूत्साहीत केले नाही व यासाठीच मी हे आरंभ करण्याचे धाडस केले आहे. युध्दजन्य परिस्थितीने जरी समस्या संपल्या नाहित तरी माझी बुध्दी मला हे कार्य प्रारंभ करण्यासाठी प्रेरित करित आहे.
मासिक पत्रिकेचे उद्देश
    • १. सर्वांना भ्रमापासुन सत्य अर्थात, जडापासुन चेतन, क्षणभंगुरतेपासुन नित्यता वेगळे पाहण्यास मदत करणे.
    • २. भौतिकवादाचे दोष उघडे करणे.
    • ३. वैदिक संस्कृतिनुसार आध्यात्मिक जीवनाकरिता प्रशिक्षण देणे.
    • ४. वैदिक संस्कृतीचे जतन व प्रचार करणे.
    • ५. भगवान चैतन्य महाप्रभुंच्या शिकवणीनुसार भगवंतांच्या दिव्य नामाचे संकिर्तन करणे.
    • ६. पूर्ण पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करण्यात आणि त्याची सेवा करण्यात आखिल जीवमात्रांना मदत करणे
  1. बॅक टु गॉडहेह चा दुसरा अंक छापाई करायची होती तेव्हाही त्यांना पुर्वीच्या समस्येला पुन्हा तोंड द्यावे लागले, त्यांना यावेळीही युध्दामुळे कागदावर बंदी असल्याचे कारण सांगुन दोन वेळा त्यांचे निवेदण नाकारण्यात आले तेव्हा श्रील प्रभुपाद यांनी १० जुलै १९४४ रोजी तिसरे पत्र लिहले. त्यामध्ये त्यांनी नमुद केले की गौडिय वैष्णवांचे आध्यात्मिक गुरू श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती महाराज यांच्या आदेशानुसार मी हे बॅक टु गॉडहेड हे मासिक चालु केले आहे. हे जग सध्या ज्या अशांतीतुन जात आहे त्यामध्येच या पत्रिकेचे नावच त्याच्या उद्देशाला निर्देशित करित आहे. बॅक टु गॉडहेड. यासाठी अधिक नाही तर कमीत कमी एक पान छापण्यासाठी तरी मला अनुमती मिळावी, परंतु माझी ही विनम्र प्रार्थना आहे की सरकारने या वातावरणाचा प्रसार होऊ द्यावा जो माझ्या या पत्रिकेचा उद्देश आहे. म्हणुन कृपा करून यावर गांभिर्याने विचार करावा आणि मला प्रति सप्ताह किंवा प्रतिमास, जसे आपणास ऊचीत वाटत असेल , मानवतेसाठी आणि भगवंतांसाठी कमीतकमी एक पान प्रकाशित करण्याची अनुमती द्यावी व याला कागदाची साधारण विल्हेवाट समजु नये. ( श्रील प्रभुपाद लिलामृत - प्रकरण ५)
  2. श्रील प्रभुपाद यांनी हे मासिक आपल्या गुरूंच्या आज्ञापुर्तीसाठी चालु केले होते म्हणुन श्रील प्रभुपाद नेहमी म्हणत असत की प्रत्येक दृष्टीने बिटिजी चा मुख्य उद्देश भक्तिसिद्धांत सरस्वती यांची आज्ञापालन करणे हाच आहे.
  3. आपल्या मासिकाच्या उद्देशाविषयी सांगताना, श्रील प्रभुपाद १९४४ साली प्रकाशित केलेल्या पहिल्या मासिकात लिहीतात - बॅक टु गॉडहेड म्हणजे माझे गरू महाराज, कृष्णकृपाश्रीमुर्ती श्री श्रीमद भक्तिसिद्दांत सरस्वती श्रील प्रभुपाद ( संपूर्ण भारतातील गौडीय मठाचे प्रख्यात संस्थापकाचार्य ) यांच्या निर्देशनाखाली कृष्णभक्तीच्या प्रसारासाठी पार पाडलेला माझा एक तुच्छ प्रयत्न आहे, ज्याचा मुळ उद्देश या भौतिक संसारातील बद्ध जिवांचा भगवंतांशी असलेल्या शाश्वत संबंधाची पुनर्स्थापणा करणे हा आहे.
  4. श्रील प्रभुपाद स्वत: मासिक उद्देश सांगताना म्हणतात : की त्यांच्या या मासिकामध्ये भारतातील महान ऋषि आणि विशेषकरून भगवान चैतन्य महाप्रभु यांचे दिव्य संदेश प्रकाशित होतील. व त्यांचे एकमात्र कर्तव्य की एक अनुवादकाप्रमाणे त्या संदेशाची पुनरावृत्ती करणे, न की काही स्व निर्मित करणे, तर हे शब्द भगवंतांकडे नेणा-या दिव्य ध्वनीप्रमाणे अवतरीत होतील. ( प्रकरण ५ युध्द )
  5. मासिक विषयवस्तु विषयी :
    श्रील प्रभुपाद म्हटले होते की या मासिकातील विषयवस्तु चेतनेच्या पूर्ण भिन्न स्तरावरील असल्यामुळे वाचकांना शुष्क वाटु शकेल, परंतु जो या संदेशाला ध्यानपुर्वक वाचेल तो निश्चित लाभान्वित होईल. जसे ज्या व्यक्तिला काविळ झालेली आहे त्या व्यक्तिस खडीसाखर गोड लागत नाही तरिही काविळ झालेल्या व्यक्तिसाठी खडीसाखर हे औषध आहे, रोगमुक्तिसाठी त्याने याचे नियमीत सेवन केले तर हळुहळु त्यास खडीसाखर ही गोड लागेल. म्हणुन आम्ही या मासिक वाचकांनाही याच विधिची शिफारस करीत आहोत. ( प्रकरण ५ युध्द )
  6. बॅक टु गॉडहेड मासिकाचा मुख्य विषय हा भक्तिसिध्दांत सरस्वती ठाकुर यांची आज्ञा पालन करणे हा होता. मासिकाच्या मुखपृष्ठावरील भक्तिसिध्दांत यांच्या विचारमग्न अवस्थेतील त्यांचे चित्रातुन, तसेच त्यांचे समर्पण, त्यांचे उद्देश सांगण्यावरून, त्यांचे अंकाचे संपादन करण्यावरून, संकिर्तन प्रसार करण्याच्या त्यांच्या भविष्यवाणीवरून तसेच त्यांच्या प्रत्येक पैलुतुन ( पहलु से ) बॅक टु गॉडहेड चा मुख्य उद्देश श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती ठाकुर यांची आज्ञा पालन करणे हाच होता. ( प्रकरण ५ युध्द )
  7. डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पत्र :
    मी हे भौतीक शरीर त्याग केल्यानंतर भगवदधामी जाण्याचे सुत्र प्राप्त केले आहे, आणि माझ्यासोबत माझ्या समकालीन असलेल्या सर्व स्त्री पुरूषांना भगवदधामी घेऊन जाण्यासाठी मी हे पत्रक सुरू केले आहे. कृपा करून मला कोणी चमत्कारीक किंवा वेडा समजु नका, मी जेव्हा म्हणतो की वर्तमान शरिर त्याग केल्यानंतर मी भगवदधामी जाणार तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि सर्वांसाठी शक्य आहे. ( श्रील प्रभुपाद लिलामृत प्रकरण - ८ )
आध्यात्मिक साहित्य
  • भारतामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची उणीव नाही, हे साहित्य इतके विशाल आहे की जगातील सर्व वृत्तपत्र एकत्र केले तरी याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. श्रील प्रभुपादांचे गुरू महाराज श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती ठाकुर यांना एका राजनेत्याने प्रश्न केला की ‘‘ नादिया प्रकाश या वृतपत्र आपण दैनिक कसे प्रसिध्द करू शकता, तेव्हा श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती ठाकुर यांनी ऊत्तर दिले की ही काही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही, पहा हे कलकत्ता नगर हे एक भारतातील अनेक नगरांपैकी एक छोटे ऊपनगर आहे त्याविषयी माहीती देण्यासाठी येथुन अर्धा डझन वृत्तपत्र प्रकाशित केली जातात . भारत पृथ्वीवरील अनेक राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे, पृथ्वी ब्रम्हांडातील अनेक ग्रहांपैकी एक लहानसा ग्रह आहे, व हे ब्रम्हांड विश्वातील अनेक ब्रम्हांडांपैकी एक आहे. व ही सर्व सृष्टी भगवंतांच्या सृष्ट्रीचा एक तुच्छ अंशमात्र आहे. नादिया प्रकाश यामध्ये पृथ्वीवरील नव्हे तर अनंत अशा आध्यात्मिक जगताचे समाचार यातुन प्रकाशित होत असतात, जर पाठकांची ऊणीव नसेल तर आम्ही प्रतिक्षणास एक एक वृत्तपत्र प्रकाशित करू शकतो. (लिलामृत-प्रकरण ५ युध्द)
श्रील प्रभुपाद यांनी बि.टि.जी साठी घेतलेले परिश्रम
  1. कागदासाठी संघर्ष :
    मासिकासाठी हस्तलिखित पूर्ण झाल्यानंतर ते सरस्वती प्रेस येथे घेऊन गेले जो बंगालमधील सर्वोत्तम छापखाना होता. कलकत्ता येथील प्रतिष्ठित पुस्तक विक्रेता थैकर स्पिक एंड कंपनीस त्यांनी आपला एजंट बनविले, त्यांचे कार्य हे होते की त्यांनी पत्रिकेचे वितरण पुस्तक भण्डारामध्ये, ग्रंथालयामध्ये आणि काही अन्य देशामध्ये करायचे. जेव्हा ते कागद खरेदि करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना सरकारी व्यवस्थापणाशी संघर्ष करावा लागला. युध्द तसचे कागदाच्या कमतरतेमुळे त्यांनी जे लिहले होते त्याचे परिक्षण सरकारी आवश्यकतेनुसार होणार होते. समाजातील या संकटयुक्त स्थितीमध्ये एका सामान्य व्यक्तिच्या धार्मीक साहित्यास प्राथमिकता मिळणे फार कठिण होते. कागदासाठी त्यांची प्रार्थनेस इतर कारणे देऊन नाकारण्यात आले परंतु श्रील प्रभुपाद मागे हटले नाहीत त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांना अखेर ४४ पानाच्या बॅक टु गॉडहेड मासिकाचे प्रथम संस्करण छापण्यास अनुमती देण्यात आली.
  2. बॅक टु गॉडहेह चा दुसरा अंक छापाई करायची होती तेव्हाही त्यांना पुर्वीच्या समस्येला पुन्हा तोंड द्यावे लागले, त्यांना यावेळीही युध्दामुळे कागदावर बंदी असल्याचे कारण सांगुन दोन वेळा त्यांचे निवेदण नाकारण्यात आले तेव्हा श्रील प्रभुपाद यांनी १० जुलै १९४४ रोजी तिसरे पत्र लिहले. त्यामध्ये त्यांनी नमुद केले की गौडिय वैष्णवांचे आध्यात्मिक गुरू श्रील भक्तिसिध्दांत सरस्वती महाराज यांच्या आदेशानुसार मी हे बॅक टु गॉडहेड हे मासिक चालु केले आहे. हे जग सध्या ज्या अशांतीतुन जात आहे त्यामध्येच या पत्रिकेचे नावच त्याच्या उद्देशाला निर्देशित करित आहे. बॅक टु गॉडहेड. यासाठी अधिक नाही तर कमीत कमी एक पान छापण्यासाठी तरी मला अनुमती मिळावी, परंतु माझी ही विनम्र प्रार्थना आहे की सरकारने या वातावरणाचा प्रसार होऊ द्यावा जो माझ्या या पत्रिकेचा उद्देश आहे. म्हणुन कृपा करून यावर गांभिर्याने विचार करावा आणि मला प्रति सप्ताह किंवा प्रतिमास, जसे आपणास ऊचीत वाटत असेल , मानवतेसाठी आणि भगवंतांसाठी कमीतकमी एक पान प्रकाशित करण्याची अनुमती द्यावी व याला कागदाची साधारण विल्हेवाट समजु नये. ( श्रील प्रभुपाद लिलामृत - प्रकरण ५) पत्रास सफलता मिळाली, दुस-या अंकात त्यांनी भारत सरकारचे आभार व्यक्त केले, पत्रिका छापण्यावर प्रतिबंध केल्याने निराश झालेल्या वाचकांना त्यांनी सुचीत केले की इथुन पुढे पत्रिका प्रत्येक महिन्यास प्रकाशित होईल, व त्यांनी पत्रिकेमध्ये सरकारचे अनुमती मिळालेले पत्र व त्यांनी सरकारी कागद अधिकारी यांना लिहलेले पत्रही छापले.
  3. १९४४ नंतर आर्थिक पुरवठ्याअभावी हे पत्रक काही काळ बंद पडले होते परंतु या दरम्यान प्रभुपाद हे निरंतर लिखान करित असत. त्यानंतर इलाहाबाद येथील आपल्या व्यवसायामध्ये त्यांनी काही धन एकत्र केले आणि फेब्रुवारी १९५२ मध्ये त्यांनी मासिकाचे पुन: प्रकाशन चालु केले. पुर्विप्रमाणे ते स्वत: मासिकासाठी लेखन, टाईप करणे, संपादन करणे व मुद्रकास भेटुन प्रिंट करणे, त्याचे वितरण करणे व भारतातील प्रतिष्ठित नेता यांना पोस्टाने पाठविणे हे सर्व ते स्वत: च करित होते.
  4. कधीकधी ते समाचार पत्र ही पाहत असत व त्यामधुन काही लेख फाडुन घेत असत जे त्यांना लिखाण करण्यास प्रेरित करित असे, अशा लेखांचे ते बॅक टु गॉडहेड मासिकामधुन उत्तर देत असत.
  5. १९५२ साली पुन: सुरू केलेले हे मासिक काही काळासाठी आर्थिक कमतरतेमुळे पुन: बंद पडले. परंतु श्रील प्रभुपाद नेहमी या मासिकाविेयी विचार करित असत पुन: ४ वर्षानंतर हे मासिक पुनरजीवित करण्याचा ते विचार करू लागले. आपले मासिक विचारशील लोकांपर्यंत कसे पोहोचेल जे कृतज्ञतापुर्वक त्याचे अध्ययन करतील याविषयी ते नेहमी विचार करीत असत.
  6. श्रील प्रभुपाद दिल्लीमध्ये एकटे होते. मासिक छपाईसाठी ते कठोर परिश्रम घेत असत हिवाळयातील ४० डिग्री असलेली प्रखर थंडी सहन करित दिल्लीच्या रस्त्यांमधुन ते अंतीम प्रुफ पाहण्यासाठी सुरेंद्रकुमार जैन या मुद्रकांकडे जात असत. पैसे वाचविण्यासाठी ते पायी पायी जात असत, केवळ कागद खरेदी करून मुद्रकांकडे देण्यासाठीच केवळ ते रिक्षा करित असत.प्रखर थंडीतही त्यांच्याजवळ कोणतीही चादर नव्हती. केवळ एक साधे जॅकेट ,रबरी चप्पल व एक सुती कानटोपी ते धारण करित असत.
  7. मासिक प्रकाशनासाठी मुद्रक कुमार जैन यांच्याशी त्यांचा नेहमी संपर्क येत असत. ते त्यांच्याविषयी सांगताना म्हणतात की - स्वामीजी जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी पहीले हे अनुभविले की स्वामीजी हे खुप साधे व प्रामाणिक व्यक्ती आहेत. ते ज्या अवस्थेत माझ्याकडे येत असत ते पाहुन मला त्यांच्यावर दया येत असे. मला माहित होते की त्यांच्याजवळ २५ पैसेही नाहीत, संपूर्ण रस्ता ते चालत आले आहेत काहीही न खाता. मी त्यांना विचारीत की तुम्ही काही खाल्ले आहे की नाही त्यावर ते म्हणत की नाही श्रीमान जैन, प्रुफ पाहायचे होते म्हणुन आलो. प्रुफ ते स्वत:च पाहत असत. संपूर्ण छपाई होईपर्यंत प्रेसमध्येच थांबुन राहत असत, त्यावेळी त्यांचे मिशन हे बॅक टु गॉडहेड या मिशनला वाढविणे हेच होते. त्यांची आर्थिक स्थिती फार खराब होती, केव्हा केव्हा फार कठिणाईने छपाई होत होती कारण ते कागदाचा प्रबंध करू शकत नव्हते तर कधी धनाची कमतरता. मी त्यांना म्हटले स्वामीजी आपणास इतका त्रास होत आहे तर तुम्ही हे पत्रक चालु का ठेवत आहात तेव्हा ते म्हणत की हे माझे मिशन आहे आणि जिथपर्यंत मला शक्य आहे मी यास वाढवित राहणार. अनेकदा त्यांना छपाईची बिले भागविणेही कठीण होते तरीही ते पत्रक छापत असत मी बिलाविषयी विचारणा केली असता ते म्हणत असत तुम्ही चिंता करू नका विश्वास ठेवा तुमचे पैसे तुम्हाला निश्चित मिळतील. ते पैसे देऊ शकत नसत तेव्हा ते अडचणीत पडत, परंतु मी त्यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न कधीही करीत नसे ( प्रभुपाद लिलामृत - प्रकरण ८ ) बॅक टु गॉडहेड मासिक हे श्रील प्रभुपादांना अतिशय प्रिय होते . भारतामध्ये असताना अनेकदा त्यांना मासिकाचे प्रकाशन आर्थिक पुरवठयाअभावी रद्द करावे लागले ; मात्र १९६६ साली कृष्णभावनेच्या प्रसारासाठी अमेरिकेत गेले असता , थोडयाच अवधित आपल्या सुरूवातीच्या काही शिष्यांच्या सहाय्याने त्यांनी या मासिकाचे प्रकाशन पुन्हा सुरू केले. आपल्या शिष्यांना लिहीलेल्या पत्रांमधुन श्रील प्रभुपादांना बॅक टु गॉडहेड या मासिकाविषयी असलेल्या आस्थेची कल्पना येईल- मी इकडे भारतात आल्यापासुन मला बी.टी.जी. ची एक देखील प्रत मिळालेली नाही, तुम्ही तेथे मासिकाचे प्रकाशन करित आहात की नाही. ( ३ ऑक्टोबर १९६७ साली लिहीलेले पत्र )
  8. पुन: प्रकाशन :
    श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशात गेल्यानंतर काही काळ या मासिकाचे प्रकाशन बंद पडले होते. श्रील प्रभुपाद यांनी आपल्या काही शिष्यांच्या मदतीने एक प्रेस खरेदि केली आणि आपले दोन शिष्य हयग्रीव आणि रायराम यांना या पत्रिकेचे पुन: प्रकाशन करण्याची सेवा त्यांना दिली. त्यांनी अंकासाठी लागणारी सर्व सामग्री एकत्र केली आणि प्रथम अंक छापण्यात आला. श्रील प्रभुपाद यांनी संपादकांना प्रथम सूचना ही दिली की ही पत्रिका नियमीतपणे प्रतीमास छापणे, जरी याचे वितरण करू शकलो नाही तरीही. जरी ते याचे २ किंवा ३ पाने जरी प्रकाशित करू शकले तरी याचा स्तर कायम ठेवण्यात यावा असा श्रील प्रभुपाद यांनी आपल्या शिष्यांना निर्देश दिले.
  9. या मासिकासाठी हयग्रीव दास ब्रह्मचारी यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाने श्रील प्रभुपाद अतिप्रसन्न झाले होते त्यांनी हयग्रीव यांना आपल्या खोलीत बोलविले आणि ३ खंडांचा एक सेट भेट म्हणुन दिला ज्या प्रत्येक खंडाच्या मुख्य पृष्ठावर लिहीले होते - ‘‘ हयग्रीव दास ब्रह्मचारी यांस आपल्या आशिर्वादासह - ए.सी.भक्तिवेदांत स्वामी ’’ अशा प्रकारे हयग्रीव यांची स्तुती केल्यानंतर श्रील प्रभुपाद त्यांना म्हणाले की इथुन पुढे तू बॅक टु गॉडहेड याचे संकलन कर, निष्ठेने कार्य करीत रहा आणि या मासिकास टाईम पत्रिकेप्रमाणे विशाल बनव.
मासिक वितरण
श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे बि.टि.जी वितरण
  1. एक वेळ दिल्ली येथे असताना श्रील प्रभुपाद मासिक वितरणासाठी एका रस्त्याहुन जात असताना एका गाईने त्यांच्यावर हल्ला केला, प्रभुपाद खाली कोसळले. ते उठु शकत नव्हते आणि त्यांच्या मदतीसाठीही कोणी आले नाही. त्या अवस्थेत ते विचार करू लागले की असे का झाले ?
  2. दिल्लीमधील कडक उन्हाळयातही मासिक वितरण:
    उन्हाळयाच्या ऋतुमध्ये ११० डिग्री तापमान असे तेव्हा अशा अवस्थेत घरातुन बाहेर जाणेही अशक्य होत असे. फेरीवाले व्यापारी दिवसाच्या वेळी आपला धंदाही बंद करित असत . अशा गर्मीमध्ये काही व्यक्ती मृत्युमुखी पडत होते , परंतु श्रील प्रभुपाद यांनी आपल्या शरीराची पर्वा न करता बॅक टु गॉडहेड वितरण करण्यासाठी विविध ठिकाणी गेले. असेच एकवेळ मासिक वितरण करतेवेळी गर्मीमुळे ते लडखडु लागले व तेथेच बेशुध्द पडले, त्याचवेळी त्यांचा एक परिचीत व्यक्ती तेथुन आपल्या कारने जात होता. त्यांना अशा अवस्थेत पाहुन त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांची पाहणी केली व त्यांना उष्माघात झाल्याचे सांगीतले.
  3. वृंदावन:
    त्यांची खुप काळापासुन वृंदावन येथे निवास करण्याची इच्छा होती. परंतु त्याचे प्रयोजन मात्र हेच होते की बॅक टु गॉडहेड साठी लेख लिहणे, दिल्ली येथे मुद्रकाकडे जाऊन पाहणी, छपाई करणे, तसेच जेव्हा जेव्हा शक्य होईल दिल्लीला जाऊन मासिकाचे वितरण करणे. परंतु त्यांना वृदावन येथेच रहायचे होते व तेथुनच त्यांना हे कार्य करायचे होते.
  4. मुद्रकाकडुन मासिक प्रती मिळाल्यानंतर श्रील प्रभुपाद नगरामध्ये दुकानांमध्ये, घराघरांमध्ये जाऊन वितरण करीत असत. कधी ते एखाद्या चहाच्या दुकानावरती बसत व जो कोणी त्यांच्या जवळ येई त्यास ते म्हणत की कृपया बॅक टु गॉडहेड मासिकाची एक प्रत खरेदि करा. एकदा ते एका धनी व्यक्तीच्या घराजवळ गेले असता तो व्यक्ती आपल्या घराच्या वरील जीन्यातुन मोठयाने ओरडुन म्हणाला की ‘‘ इथुन चालता हो, तुझी आम्हाला गरज नाही. तसेच ज्या लोकांनी अनुदान दिले होते त्यांच्या घरी व कार्यालयामध्येही ते जात असत व त्यांना मासिकाची एक प्रत देत असत तसेच कधी ते आपल्या ओळखी अनोळखीच्या व्यक्तींकडेही जात ज्यांना ते आपले भावी ग्राहक समजत असत. जेव्हा ते नियमीत पत्रिका देत असत तेव्हा ने नेहमी मागील अंकांच्या विषयी चर्चा करित असत व त्यानुसार लेखांचे लिखानही करित असत.अनेकदा मासिक वितरण करताना त्यांना एका प्रश्नाला तोंड द्यावे लागे की - ‘ वेळ नाही ’. हे पाहुन आपल्या पुढील अंकामध्ये त्यांनी एक लेख लिहला ज्याचे शिर्षक होते - ‘‘ वेळ नाही, सामान्य मनुष्याचा मोठा ( चिरकालिक ) रोग ’’ प्रभुपाद हे काही एक साधारण मासिक विक्रेता नव्हते जे रस्त्यावरती मोठयाने ओरडुन वितरण करतात त्याप्रमाणे. ते शांतीपुर्वक लोकांच्याजवळ जात जेव्हा ते शांतीपुर्वक बसले असतील, त्यांच्यासमोर एक मासिकाची प्रत काढुन ठेवीत असत. मासिकाच्या वरती लिहीलेली विषयसुची ज्यामध्ये विषय असत की ‘‘ मानव जातीमधील सर्वात निम्न,’’ ‘‘ सामाजिक बोध के अंतर्गत दार्शनिक समस्याऍ ,’’ ‘‘ मानवजातीचे दु:ख,’’इ.. हे पाहुनच कोणी म्हणत असे की हे काही साधारण पत्र नाही. लोक म्हणतील की वेळ नाही याच्याअगोदरच प्रभुपाद त्यांना माहीती सांगत असत जेनेकी तो व्यक्ती पत्रिका खरेदी करण्यासाठी तयार होऊ शकेल. आपल्या आध्यात्मिक गुरूच्या वतीने तसेच परंपरेतील आचार्यांच्या वतीने ते साधारण वर्तमान पत्र विक्रेत्याची भुमिका ते आनंदाने पार पाडित होते. ते म्हणत की त्यांचे हे पत्र साधारण पत्र नाही त्यामध्ये खुप काही मनोरंजक वस्तुही भेटतील व मुल्य केवळ ६ पैसे होते. याप्रकारे ते चैतन्य महाप्रभुंच्या कृपेचा प्रसार करित होते. एक सहज प्राप्त पत्राच्या रूपात ते वेदांतील सत्याचे वितरण करित होते.गरीबीमुळे गांजले गेले असले तरी त्यांच्या लिखानामध्ये कधीही तिखटपणा, कडवाहट किंवा कट्टरपणा नव्हता.
  5. श्रील प्रभुपाद वृंदावन येथे असताना तेथेही ते बॅक टु गॉडहेड मासिकाचे वितरण करित असत, मासिक वितरण करणे हे त्यांच्यासाठी कठिण नव्हते परंतु मासिक छपाईसाठी, प्रवासासाठी तसेच पोस्ट व्यवहारासाठी धनाची मोठी समस्या त्याच्यापुढे होती. तसेच मासिकासाठी लेख लिहणे, संपादन करणे, वितरण करणे व लोकांकडे अनुदान मागणे हे सर्व काम एका व्यक्तीसाठी अतिशय कठिण होते. मुद्रक जैन हे पाहुन आश्चर्याने थक्क झाले की हा व्यक्ती जवळ कोणतेही साधन नसताना एका पत्रिकेसाठी स्वत:स इतक्या कठिण परिस्थितीमध्ये का टाकत आहे ?
  6. श्रील प्रभुपाद म्हणतात:
    मी बॅक टु गॉडहेड साठी दिवसरात्र कष्ट करीत असे. प्रारंभी जेव्हा मी गृहस्थ होतो तेव्हा कोणी त्याचे मुल्य देईल की न देईल याची मला चिंता नव्हती, मी उदारतेने त्याचे वितरण करीत असे. परंतु जेव्हा मी गृहस्थ जीवन त्यागुन मी एकटे राहु लागलो, कधी वृंदावनामध्ये तर कधी दिल्ली येथे तर कधी बॅक टु गॉडहेहड मासिकाच्या वितरण व प्रसारासाठी यात्रा करण्यासाठी तेव्हा ते दिवस फार कठिण होते.
  7. बि.टि.जी मधुन प्रचार:
    बॅक टु गॉडहेड मध्ये श्रील प्रभुपाद नास्तिकवादा विरूद्ध प्रचार करित होते. ‘‘ आशेच्या विरूद्ध आशा ( Hope Against Hope ) या आपल्या लेखामध्ये ते लिहीतात की बॅक टु गॉडहेड प्रती वितरण करताना ज्या ज्या लोकांशी त्यांची भेट होत होती त्यातील ८० % लोक नास्तिक होते.
  8. प्रकाशन:
    श्रील प्रभुपाद १९७१ मध्ये लंडन येथे गेले असता त्यांना श्यामसुंदर यांच्याकडुन हे समजले की त्यांनी लिहीलेल्या ग्रंथातील प्रमुख भगवदगीतेचे प्रकाशन झाले नाही तसेच कृष्ण-पूर्ण पुरूषोत्तम भगवान , श्रीमदभागवतम, भक्तिरसामृतसिंधु, चैतन्य शिक्षामृत यांसारख्या मोठया पुस्तकांचा काही स्टॉक शिल्लक राहीला नाही, पुस्तक प्रकाशन नाही व वितरण ही बंद आहे. हे ऐकुन श्रील प्रभुपाद यांनी आपल्यासमोर ऊपस्थित एक सचिवाच्या माध्यमातुन सर्व सचिवांना क्रोधाने संबोधित केले की अजुनही प्रकाशन का झाले नाही जी.बी.सी चे हे कर्तव्य आहे ‘ त्यांनी नियमीत पहावे की प्रभुपादांचे ग्रंथ स्टॉक ऊपलब्ध आहे की नाही, बॅक टु गॉडहेड पत्रिकेचे नियमीतपणे प्रकाशित व्हावी, सर्वाची देणी वेळेत करण्यात यावीत आणि मंदिरातील भक्त स्वस्थ जिवन व्यतीत करोत.( लिलामृत-प्रकरण-३६)
  9. श्रील प्रभुपादांचे जी.बी.सी साठीचे आदेश:
    श्रील प्रभुपाद यांनी जेव्हा जी.बी.सी ची नियुक्ती केली तेव्हा जी.बी.सी सचिवांसाठी त्यांनी काही निर्देश दिले ते याप्रमाणे – सचिवांनी आपल्या क्षेत्रामध्ये नियमीतपणे मंदिरांना भेटी दयाव्यात व पाहणी करावी की प्रत्येक भक्त नियमीत १६ माळांचा जप करित आहेत की नाही, नियमीत मंदिरातील समयसारणीचे पालन करित आहे की नाही, तसेच सर्व मंदिर स्वच्छ ठेवले जातात की नाही. प्रभुपादांनी नियुक्त केलेले हे १२ सचिव सर्व भार सांभाळतील आणि वर्तमान व भावि येणा-या सर्व समस्यांचे समाधान काढतील व प्रभुपादांना व्यवस्थापणाच्या भारातुन मुक्त करतील असे ठरले. परंतु हे सर्व करण्यासाठी प्रभुपादांच्या आलेख पत्रामध्ये नमुद केलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक होते त्यामध्ये प्रभुपादांनी नमुद केले होते की हे समाधान तेव्हात शक्य होईल जेव्हा प्रत्येक मंदिरातील भक्त पूर्ण पणे भक्तीमध्ये संलग्न राहतील : ते प्रतीदीन पहाटे ४:३० वा मंगलआरतीला उपस्थित राहतील, श्रीमदभागवतम वर्गासाठी उपस्थित राहतील, संस्कृत श्लोकांचे पठण करतील, रस्त्यावरती किर्तन करतील व बॅक टु गॉडहेड पत्रिका तसेच आपल्या अन्य साहित्याचे वितरण करतील.( प्रभुपाद लिलामृत प्रकरण-३१ )
  10. श्रील प्रभुपाद बीटीजी वितरणाविषयी
    1. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकुर:
      श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकुर हे नेहमी पत्रिका व पुस्तके विकण्यासाठी बाहेर पाठवित असत व कोणी एक दोन प्रती जरी वितरण केल्या तरी ते खुप प्रसन्न होत असत व तुम्ही कीती चांगले केले म्हणुन त्यांची स्तुतीही करीत.
    2. बोस्टन येण्यापुर्वी लिहीलेले पत्र:
      संकिर्तन आणि बॅक टु गॉडहेड आणि आपल्या इतर साहित्याचे वितरण आपल्या आंदोलनाचे प्रमुख (क्षेत्र) कार्य आहे. मंदिरात उपासना करणे हे दुस-या क्रमांकाचे कार्य आहे. त्यावेळी प्रतीमहीना ५० हजार प्रतींचे प्रकाशन होत असे आणि श्रील प्रभुपादांना त्याची अधिकाधिक विक्री अपेक्षित होती. ( श्रील प्रभुपाद लिलामृत – प्रकरण ३१
    3. बि.टि.जी मासिक हे माझे सर्वस्व आहे:
      १६ एप्रिल १९७० साली लिहिलेल्या एका पत्रात श्रील प्रभुपाद लिहितात- ' बि.टि.जी मासिक हे माझे सर्वस्व आहे.' यावरून श्रील प्रभुपादांना या मासिकाविषयी असलेल्या आत्मियतेची आपणास प्रचिती येईल.
    4. मी इकडे भारतात आल्यापासुन मला बी.टी.जी. ची एक देखील प्रत मिळालेली नाही, तुम्ही तेथे मासिकाचे प्रकाशन करित आहात की नाही. ( ३ ऑक्टोबर १९६७ साली लिहीलेले पत्र )
    5. बी.टी.जी. वितरणाला मी इतके महत्व देतो, कारण:
      सुरूवातीला भारतात असताना मी एकटेच दिवसरात्र कष्ट घेऊन या मासिकाचे लेखन, मुद्रण आणि प्रकाशन करित असे. त्यावेळी या बी.टी.जी. मासिकासाठी घेतलेले कठोर परिश्रम अजुनही माझ्या स्मरणात आहेत. ( श्रील प्रभुपाद यांनी १४ एप्रिल १९७० रोजी लिहलेले पत्र )
    6. श्रील प्रभुपाद एकदा म्हटले होते की मी पुस्तकांच्या विक्रिविषयी नेहमी चिंतातुर असतो यासाठी या कार्यास योजनाबद्ध करणे आवश्यक आहे. ( किर्तनानंद यांना पत्र २७ एप्रिल १९६७
    7. मी मृत्युनजीक जात आहे तरी मी माझ्या प्रकाशनांना विसरू शकत नाही . मी जगो अथवा मरो माझी इच्छा ही आहे की तुम्ही माझ्या प्रकाशनांना पूर्ण गांभिर्याने जतन करून ठेवावे ( हयग्रीव यांना पत्र १० जुन १९६७ )
    8. जेव्हा ही पुस्तके तुमच्या मंदिरात येतील तेव्हा या पुस्तकांच्या विपुल प्रमाणात वितरण कार्यासाठी आपल्या गुरूबंधुंना सहायता करू शकला तर ही एक फार मोठी सेवा तुमच्याकडुन होईल, आम्ही ऊच्च कोटीचे प्रचूर साहित्य निर्माण करित आहोत परंतु याबरोबर जनसामान्यांमध्ये या साहित्याचे वितरण करणे हे ही अत्यावश्यक आहे. ( जयपताका स्वामी महाराज यांना पत्र १ डिसेंबर १९६८ )
    9. तुम्ही जितक्या अधिक निष्ठेने कृष्णांची सेवा कराल तितक्या प्रमाणात कृष्ण आपणास अधिक बुध्दिमत्ता प्रदान करतील.
    10. आपण माझ्या पुस्तक वितरण कार्यास वर्तमानपत्र तसेच आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे वृध्दि करण्यासाठी प्रयत्नशिल रहा, श्रीकृष्ण निश्चितच आपल्यावरती प्रसन्न होतील. आपण श्रीकृष्णांविषयी जनसामान्यांचे ज्ञानवर्धन करण्यासाठी दूरदर्शन, रेडियो, फिल्म अथवा अन्य कोणत्याही आधुनिक साधनांचा ऊपयोग करू शकतो, भक्तीव्यतिरिक्त सर्व आधुनिक ऊपकरण बेकार आहेत. ( भगवान यांना पत्र - २४ नोव्हेंबर १९७० )
    11. श्रील प्रभुपाद म्हणतात की आपण सदैव या विषयी विचार केला पाहिजे की कृष्णांचा संदेश आपण कसा वितरीत करू शकतो आणि कृष्ण निश्चितच त्यासाठी आपणास सुविधा प्रदान करतील. ( कर्णधार यांना पत्र - ३० नोव्हेंबर १९७० )
    12. भगवद्दर्शन ( जाऊ देवाचिया गावा ) वितरण कार्यास सुचारूरूपसे चालवण्याची व्यवस्था करा. संकिर्तन, पुस्तक व पत्रिकेचे वितरण हाच आपला मुख्य कार्यक्रम आहे, इतर सर्व गोष्टी दुस-या स्थानावर आहेत म्हणुन संकिर्तन व पुस्तक वितरण कार्य जोरशोरसे ( मोठयाप्रमाणात ) करा. ( सत्स्वरूप यांना पत्र २१ जुन १९७१)
    13. जर तू केवळ माझ्या पुस्तकांच्या वितरण करण्याच्या ,एकमेव कार्यासच वृद्धिंगत करीत राहशील तर सर्वप्रकारे यशप्राप्ती करशील. ( ललीतकुमार यांना पत्र - १५ नोव्हेंबर १९७१ )
    14. पुस्तके व पत्रिकांचे वितरण हे आपली सर्वात महत्वपुर्ण गतीविधी आहे. पुस्तके व पत्रिकांच्या अभावी आपणाकडे प्रचारासाठी अन्य कोणतेही साधन नाही. ( च्यवन यांना पत्र २६ डिसेंबर १९७१ )
    15. जितक्या अधिक प्रमाणात या साहित्याचे वितरण आणि पठण होईल तितक्या अधिक प्रमाणात या संसाराचे मंगल होईल ( लिलावती यांना पत्र - २६ मार्च १९७२ )
    16. ही पुस्तके व पत्रिका हे मायारूपी अज्ञानाच्या सेनेस पराभुत करण्यासाठी मोठे प्रचार अस्त्र आहे, जितके अधिक प्रमाणात या साहित्याचे प्रकाशन व वितरण करू तितक्या अधिक प्रमाणात आपण या संसारास आत्मघातकी मार्गापासुन वाचवु शकु. ( जयाद्वैत यांना पत्र - १८ नोव्हेंबर १९७२ )
    17. जर एखाद्या व्यक्तीने एकही पुस्तक खरेदि केले तर त्याचे जिवन निश्चित बदलेल, हे शक्य आहे आणि हेच सर्वोत्तम प्रचार कार्य आहे. ( जगदिश यांना पत्र - १८ नोव्हेंबर १९७२ )
    18. ब्राह्मण नेहमी सत्यवादी असतात, ऐवढे की ते आपल्या शत्रुंशीही सत्यवचने बोलतात. आपल्या पुस्तकांमध्ये इतके गुण आहेत की तुम्ही निष्ठापुर्वक याच्याविषयी कोणास सांगीतले तर ते निश्चितच आपली पुस्तके खरेदि करतील. तुम्ही सत्य वचनाची कला विकसीत केली पाहीजे खोटेपणाची नव्हे. परमसत्याविषयी ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यासाठी प्रेरित करा छळ कपटाने नको, हा कृष्णभावनामृत विकासाचा परिपक्व स्तर आहे. ( गोविंद यांना पत्र २५ डिसेंबर १९७२ )
    19. आध्यात्मिक गुरूच्या इच्छांचे व आदेशांचे निष्ठापुर्वक पालन करणे हीच कृष्णभावनेतील प्रगती आहे, कारण माझे गुरू महाराज यांनी मला तसा आदेश दिला होता , असाच आदेश मी तुला देत आहे की प्रचार करित रहा व या कृष्णभावनामृतास संपुर्ण विश्वामध्ये प्रसारित कर. ( त्रयी यांना पत्र - २७ डिसेंबर १९७२ )
    20. पुस्तक वितरणावर अधिक भर देणे हे तुझे कार्य पुर्ण ऊचीत आहे. मी समजु शकतो की ऊत्तरी केंद्रामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे परंतु तरीही तुम्ही सर्व संकिर्तन साठी बाहेर जाता. जे मुले मुली या कठिण परिस्थितीतही पुस्तके वितरण कार्यात संलग्न आहेत, कृपया त्या सर्वांना सांगा की मी त्यांना माझा आशिर्वाद प्रदान करित आहे. ( जगदिश यांना पत्र - ८ जानेवारी १९७४ )
    21. आपला पुस्तक वितरण कार्यक्रम आपल्या आंदोलनाचे पोषण करण्यास पर्याप्त आहे. ( तमालकृष्ण यांना पत्र - १३ ऑगस्ट १९७४ )
    22. या ग्रंथांच्या वाचकांपैकी एक शतांश वाचक जरी भक्त बनले तरी संपुर्ण जगाचे परिवर्तन घडुन येईल.
मासिका विषयी श्रील प्रभुपादांच्या योजना व इच्छा
  1. श्रील प्रभुपादांनी जीवनात नेहमी उच्च ध्येये ठेवली. त्यांना संपुर्ण विश्वामध्ये कृष्णभावनेचा प्रचार करायचा होता. सुरूवातीला न्युयॉर्क येथे प्रचारासाठी एक छोटीशी खोली मिळताच, त्वरित त्यांनी आपल्या आंदोलनाची आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ या नावाने एक अधिकृत आध्यात्मिक संस्था म्हणुन नोंदणी . आपल्या बि.टी.जी मासिकासाठी देखील त्यांचे असेच उच्च धोरण होते. श्रील प्रभुपादांना बी.टी.जी ला त्यावेळच्या ' टाईम, लाईफ,...' इत्यादिंसारख्या सर्वोच्च खपाच्या मासिकांप्रमाणे विशवविख्यात बनवायचे होते आणि ती तर केवळ मासिकाची सुरूवात होती. त्यावेळीच श्रील प्रभुपादांच्या बी.टी.जी. विषयी इतक्या उच्च अपेक्षा होत्या म्हणुन सतत पत्रांद्वारे ते आपल्या शिष्यांना मासिकासाठी त्यांचे कृष्णभावनामृतातील साक्षात्कार स्वत:च्या शब्दात मांडुन लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित करीत.
  2. नुकतीच प्रकाशित झालेली ही बी.टी.जी मासिके मला अतिशय प्रोत्साहित करित आहेत, या मासिकाचा दर्जा उच्च ठेवुन त्यात इतकी सुदारणा व्हावी की, आपले हे बी.टी.जी. मासिक ' लाईफ,टाईम..' या मासिकांशी तोडीस तोड ठरेल.( १८ नोव्हेंबर १९६७ रोजी लिहीलेले पत्र )
  3. अमेरिकेत ज्याप्रमाणे ' रिडर्स डायजेस्ट, लाईफ...' या मासिकाचे प्रचंड प्रमाणात वितरण होत आहे, त्याच प्रमाणात आपल्या बी.टी.जी. मासिकाच्याही लाखो प्रति छापून त्यांचे संपूर्ण विश्वभरामध्ये वितरण होत असल्याचे मला पहायचे आहे. ( १६ एप्रिल १९७० रोजी लिहीलेले पत्र )
  4. कृष्णभावनामृत हे केवळ भारतीयांसाठीच नव्हते तर विदेशीयांसाठीही होते व हीच श्रील भक्तिसिध्दांत ठाकुर यांची आज्ञा होती म्हणुन त्यांनी बॅक टु गॉडहेड हे विदेशामध्येही पाठविण्याचे ठरविले. त्यांचे एजंट थैंकर स्पिंक एंड कंपनी यांच्याद्वारे त्यांनी हे करण्याचे ठरविले.
  5. पाश्चात्य देशात प्रचार करण्यापुर्वी श्रील प्रभुपाद गौडीय मठाद्वारे मदत घेऊन प्रचार कार्य वाढवण्याचा विचार करीत होते. नारायण महाराज यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांचे बॅक टु गॉडहेड याविषयीचे धोरण दिसुन येते - मी एक इंग्रजी पत्रक चालु करू इच्छितो तसेच माझे बॅक टु गॉडहेह याचे पुन: प्रकाशन इलस्ट्रेटेह वीकली ऑफ इंडीया या मासिकाप्रमाणे करू इच्छितो. ( प्रभुपाद लिलामृत प्रकरण ८ )
  6. पाश्चात्य देश प्रचार करण्यापुर्वी श्रील प्रभुपाद भारतात प्रचार करीत असताना ते विश्वभर प्रचार कार्यासाठी भारतामध्ये भक्तांचा एक संघ ( लीग ऑफ डिवोटिज ) स्थापण करू इच्छीत होते. यासाठी लिग ऑफ डिवोटिज च्या नावे त्यांनी ‘‘ उदार जनता, आधुनिक तत्वज्ञानी, समाजातील नेता व धर्मांचे अनुयायी यांच्या नावे एक निवेदण तयार केले त्यामध्ये ते म्हणतात की - लीग ऑफ डिवोटिज यांचे कार्यकलाप असतील की बॅक टु गॉडहेड मासिकास इंग्रजीमध्ये आणि इतर सर्व भाषांमध्ये अनुवादित करून प्रकाशित करणे, तरूण पुरूष आणि महिलांना विश्वव्यापी प्रचारासाठी प्रशिक्षित करणे आणि दिव्य साहित्याच्या प्रकाशनासाठी एक प्रेस चालु करणे.याद्वारे श्रील प्रभुपाद बी.टी.जी मासिकाची वृद्धी करू इच्छीत होते.
  7. प्रचार अधिक व्यापक बनविण्यासाठी बी.टी.जी योजना:
    प्रचारास अधिक व्यापक बनविण्यासाठी त्यांनी बॅक टु गॉडहेड मासिकाच्या प्रती भारताबाहेर पाठविणे हे होते. या कार्यासाठी मोठया अनुदानाची गरज होती त्यासाठी अनुदानकर्ता बनण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी अनुदानकर्त्याचे नाव प्रत्येक अंकामध्ये प्रकाशित केले जाईल. अनुदान मोठया प्रमाणात आले तर जास्ती जास्त प्रती छापुन ५० हुन अधिक देशात पाठविणे हा यामागे त्यांचा हेतु होता.कोणत्या देशात किती प्रती पाठवायच्या हे त्यांनी निश्चित केले होते - अमेरिकेसाठी १००००, अर्जेटिना ५००, बेलजीयम ५००, ब्राजील ५००, बर्मा १०००, कॅनडा ५००, चिली ५००, चिन १००००, रशिया १००००, इग्लंड १००००. इ. परंतु अनुदान काही आले नाही आणि श्रील प्रभुपाद यांच्या योजना काही सफल झाल्या नाहीत.
श्रील प्रभुपादांची प्रचाराची तळमळ
एकदा श्रील प्रभुपादांचा सेवक त्यांच्या आंगाला मालिश करित होता तेव्हा श्रील प्रभुपाद त्यांस म्हटले की ‘ माझ्या वयाची सर्वच माणसे निवृत्ती पत्करतात, मलाही या व्यवस्थापकीय कामात गुंतुन रहावेसे वाटत नाही एकांत स्थानी सहा महिने जावावे व लेखन करावे, जेथे कोणीही येणार नाही टपालही नाही. तेव्हा सेवकाने सुचविले की तेहरान हे आपणासाठी योग्य ठिकाण आहे तेव्हा श्रील प्रभुपादांनी विचार केला व स्वत:च नव वृंदावनला पसंती दर्शविली. त्याच दिवशी पॅरिसहुन भगवानचे पत्र आले त्यामध्ये युरोपमधील केंद्रांचा दौरा करण्यासाठी त्यांना आमंत्रण आले. जसे प्रचाराचे हे आमंत्रण मिळाले प्रभुपादांच्यामध्ये ऊत्साह संचारला व लगेच जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा त्यांचा सेवक म्हणाला श्रील प्रभुपाद आत्ताच तुम्ही म्हणाला की एकांतात जावे वाटते व आत्ता लगेच प्रचार दौ-यावर जाण्यासाठी तुम्ही तयार झाला आहात. तेव्हा प्रभुपाद हसले व म्हटले की ते या जन्मी तरी मला शक्य नाही. मी प्रवास करित रहावे व जिवनाच्या या रणक्षेत्रावरच मरावे हे बरे, योद्धयाला रणभुमीवर मरण येणे हे गौरवास्पद गोष्ट आहे.
श्रील प्रभुपादांच्या शिष्यांची प्रतिज्ञा
१५ ऑगस्ट १९७१ श्रील प्रभुपादांची व्यासपुजा यामध्ये सर्व शिष्यांनी मिळुन श्रील प्रभुपादांना पुष्पवचन अर्पण केले त्यामध्ये ते म्हणतात की – या व्यासपुजेच्या शुभदिनी आम्ही आपली लेकरे आपल्या चरणांवर आमच्या भावना अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्हास आशिर्वाद प्रदान करा की आम्ही आपल्या साहित्याचे- कृष्णाच्या संदेशाचा जो आपण कृपापुर्वक प्रदान केला आहे त्याचा प्रचार पाश्चात्य देशात करू शकु आणि कोणत्याही आपापसातील मतभेदाविना परस्पर सहयोगाने राहु शकु. आम्ही विधिविधानांचे कठोरपणे पालन करू आणि शुध्द प्रतिनीधी बनुन राहु.आपल्या प्रसन्नतेसाठी आम्ही शुध्द संकिर्तन करीत राहु आणि बॅक टु गॉडहेड पत्रिकेचे वितरण करीत राहु. श्रील प्रभुपाद की जय हो.( लिलामृत-प्रकरण-३६)
बि.टी.जी चे महत्व
२० मे १९५६ रोजी प्रकाशित ६ व्या अंकाच्या मुखपृष्ठावर दिलेली सूचना : कृपया बॅक टु गॉडहेड वाचा आणि अपने व्यक्तित्व की गहरी आयामोंको पुनर्जीवित करें. इतमे एैसा कुछ नही है जो हमारे अपुर्ण इंन्द्रियबोध के आधार पर गढी गई विचारधारा हो. वरन याच्यामध्ये जे काही आहे ते आपल्या मुक्त मुनिंचे संदेश सामावले आहे. आम्ही केवळ त्यांची मदत करीत आहोत की ते सर्व स्त्री पुरूषांना जीवनाचा अर्थ सोप्या शब्दात समजावु शकतील. म्हणुन प्रत्येक जबाबदार स्त्री आणि पुरूषाने हे नियमीतपणे वाचले पाहीजे. याची किंमत नगण्य आहे. कृपया याची उपेक्षा करू नका, हे तुमच्या हितासाठी आहे. हे मानवामद्ये सुखी समाजाची निर्मिती करेल. ( लिलामृत - प्रकरण - ८)
मासिक व पुस्तक यातील फरक / अंतर
  1. मासिक हे विशिष्ट कालांतराने वारंवार प्रकाशित होत असते तर ग्रंथ हा एकदाच प्रकाशित केला जातो.
  2. ग्रंथातील लेख किंवा कथा या कधीच बदलत नाहीत तर मासिकामध्ये कालानुरूप नेहमी लेख छापले जातात, त्यामुळे मासिकामध्ये नेहमी एकप्रकारचा ताजेपणा आढळतो.
  3. मासिकाच्या माध्यमातुन आपण बाहेरील जगात चाललेल्या घडामोडींविषयी नेहमी संपर्कात राहतो; परंतु कृष्णभावनेच्या दृष्टीकोणातुन या मासिकांद्वारे जगभरातील विविध भक्तसमुहांच्या संपर्कात राहुन संपुर्ण इस्कॉनमध्ये चाललेल्या घडामोडींविषयी आपल्याला माहिती देखील उपलब्ध करून दिली जाते.
मासिकाची वैशिष्ट्ये
  1. भारतीय वैदिक संस्कृतीचे ज्ञान व ओळख
  2. शुध्द परंपरागत आध्यात्मिक ज्ञान
  3. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन लेख
  4. सर्व भौतिक व आध्यात्मिक समस्यांचे समाधान
  5. विवादास्पद घटनांवर शास्त्रोक्त स्पष्टिकरण
  6. गीतेचे स्पष्टीकरणात्मक ज्ञान
  7. भागवत, रामायण, महाभारत यातील बोधपुर्ण कथा
  8. जगभरातील प्रचार कार्याची माहीती
  9. जगभरात सर्व भाषांतुन सर्व देशात वितरण
  10. भगवदधाम प्राप्ती करून देणारे
  11. ज्ञानवर्धक
  12. मनोरंजक
  13. भारतीय वैदिक संस्कृतीचे मुर्तिमंत स्वरूप
  14. विचाराचे मंथन करणारे लेख
  15. आजच्या सामाजिक घडामोडीवर प्रकाश
ग्रंथ / बीटीजी वितरण करताना काय सांगावे
ग्रंथ वितरण करताना ग्रंथाची महती सांगावी ही श्रील प्रभुपादांची इच्छा होती. एका शिष्याने विचारले महती सांगायची म्हणजे काय सांगायचे तेव्हा प्रभुपाद म्हटले की आपण ‘कृष्ण स्वधाम उपगते ......’ हा श्लोक सांगावा व त्याचा आशय सांगावा.
मासिकामुळे भक्त कसे बनले
श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशात प्रचार करित असताना एक घटना:
अमेरीका टेक्सास येथील एक तरूणी बोनी मैकडोनाल्ड ही आपला मित्र गेरी यांच्यासोबत टेक्सास विश्वविद्यालय येथे एकत्र शिक्षण घेत व राहत होते, ते सैन फ्रांसिस्को येथे आले होते. शालेय शिक्षण घेत असताना ती नास्तिक बनली होती परंतु जेव्हा युरोप यात्रा करताना त्यांनी धार्मिक कला व ( गीरीजाघर स्थापत्य कला ) यांचे अध्ययन केले तेव्हा ती या निष्कर्षापर्यंत आली की इतके महान कलाकार चुकीचे असु शकत नाहीत. गेरी याचा जन्म जर्मनी मध्ये झाला होता त्याचे वडील वायु सेनेतील अधिकारी होते. लांब केस ठेवणे व नशा करणे यामध्ये तो टेक्सास विश्वविद्यालयातील प्रमुख तरूणांमधील एक होता. बोनी व गेरी दोघेही एल.एस.डी नशा सेवन करित होते, या नशेच्या धुंदीमध्ये असतानाच त्यांना आध्यात्मिक जीवनाचा शोध घेण्याची इच्छा निर्माण झाली व त्यांनी घरी न सांगताच त्या शोधासाठी वेस्ट कोस्ट येथे आले. दोघांनी अनेक आध्यात्मिक संस्था व पुस्तकांचे अध्ययन केले परंतु त्यामध्ये त्यांना निराशा आली. ते शाकाहारी बनले होते व नशा सेवनाने होणा-या पतनाचा ते अनुभव करू लागले होते. त्यांनी हे वाचले होते की शिष्य जेव्हा (तैयार) तयार असेल तेव्हा गुरू प्रकट होतील व ते या दिवसाच्या प्रतीक्षेमध्ये होते. एक दिवस बोनी हैट-एशबरी येथील मोठया दुकानात टेबलावर पडलेल्या पत्रिकांचा गठ्ठा पाहत होती तेव्हा त्यामध्ये ‘ बॅक टु गॉडहेड ’ मासिकाची एक प्रत मिळाली. त्यामध्ये हयग्रीव यांनी लिहीलेला श्रील प्रभुपादां विषयीचा लेखाकडे ती आकर्षीत झाली. त्या लेखामध्ये वर्णीलेली प्रभुपादांचे हास्य, त्यांचे चमचमीत डोळे, त्यांचे ( नुकीले) चप्पल तसेच इतर वर्णन केलेल्या सर्व गोष्टीवरून तीच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की हेच माझे आध्यात्मिक गुरू असु शकतील ज्यांचा ती शोध घेत होती. तीने शोध घेतला व तीला जेव्हा हे समजले की त्याच स्वामीजींनी एक आश्रम हैट-ऐशबरी येथे चालु केला आहे तेव्हा बोनी व गेरी लगेच तेथे गेले. दोघे खुप दु:खी होते प्रभुपादांता भेटल्यानंतर त्यांनी आपली व्यथा सांगीतली तेव्हा प्रभुपाद त्यांना म्हणाले की तुम्ही प्रतीदीन सकाळी व सायंकाळी माझ्या प्रवचनवर्गासाठी येते येत रहा सर्व काही ठिक होईल. दोघे तयार झाले. दुर असल्याने त्यांना प्रतीदिन मंदिरात येणे कठीण होते परंतु तरीही स्वामीजींनी सांगीतले आहे म्हणुन ते येणास तयार झाले होते. एकदा प्रभुपादांनी त्यांना विचारले तुम्ही काय करता तेव्हा त्यांनी सांगीतले की आम्ही विद्यालयामध्ये चित्रकलेचे विद्यार्थी आहोत, तेव्हा श्रील प्रभुपादांनी त्यांना कृष्णाचे चित्र काढण्यास सांगीतले. त्यानंतर दोघांनी प्रभुपादांकडे दिक्षा घेण्यासाठी प्रार्थना केली. प्रभुपादांना भेटल्यानंतर दोन आठवडयामध्ये त्यांची दिक्षा झाली. बोनी चे नाव झाले गोविंददासी व गेरी चे नाव झाले गौरसुंदर. दिक्षेनंतर दोन आठवडयानंतर श्रील प्रभुपादांनी दोघांचा विवाह संपन्न केला.
आशिर्वाद: श्रील प्रभुपाद शिष्यांना
  1. पुस्तक वितरणावर अधिक भर देणे हे तुझे कार्य पूर्ण उचीत आहे. मी समजू शकतो की उत्तरी केंद्रामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे परंतु तरीही तुम्ही सर्व संकिर्तन साठी बाहेर जाता. जे मुले मुली या कठिण परिस्थितीतही पुस्तके वितरण कार्यात संलग्न आहेत, कृपया त्या सर्वांना सांगा की मी त्यांना माझा आशिर्वाद प्रदान करित आहे. ( जगदिश यांना पत्र - ८ जानेवारी १९७४ )
  2. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची महीमा प्रसारीत करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करीत आहात, माझे गुरूमहाराज तुम्हावर अधिक प्रसन्न असतील व माझ्यापेक्षा हजारोपट अधिक आशिर्वाद ते तुम्हाला देतील व यामुळे मला अधिकच संतोष होईल.
मराठी आवृत्तीचा इतिहास
आवृत्ती छापण्याची इच्छा होती, १९७७ साली प.पु.लोकनाथ स्वामी, प.पु.राधानाथ स्वामी, प.पु.जयाद्वैत स्वामी आणि भिमा दास यांच्या मार्गदर्शनाखाली ' जाऊ देवाचिया गावा ' मासिकाचे प्रकाशन आणि वितरणाचे कार्य आकार घेऊ लागले. ' बॅक टु गॉडहेड ' मासिकाच्या हिंदी आवृत्तीचे नाव श्रील प्रभुपादांनी भगवद्दर्शन असे ठेवले होते, त्यामुळे मराठी आवृत्तीसाठीही हेच नाव ठेवण्याचे प्रथम सुचविण्यात आले, परंतु जयाद्वैत महाराजांना यापेक्षा दुसरे परिपुर्ण नाव हवे होते म्हणुन त्यांनी मराठी भाषिक भक्तांना महाराष्टातील जनतेला आवडेल असे नविन नाव सुचविण्यासाठी पुढे येण्यास आवाहन केले श्रीकृष्णचैतन्य दास यांनी तुकाराम महाराज यांच्या अभंगातुन 'जाऊ देवाचिया गावा ' हे नाव सुचविले जे ' बॅक टु गॉडहेड ' चे हुबेहुब मराठी भाषांतर वाटत होते. या शिर्षकाद्वारे लोकांना त्वरित मासिकातील लेखांच्या आध्यात्मिक स्वरूपाविषयी जाणीव होत असल्याने मराठी मासिकासाठी शेवटी ' जाऊ देवाचिया गावा ' या शिर्षकास सर्व वरिष्ठ भक्तांनी मान्यता दिली. या पहिल्या मासिकासाठी लोकनाथ स्वामी महाराजांसह इतर अनेक भक्तांनी लेख लिहिले. हा पहिला अंक महाराष्ट्राचे परम दैवत असलेल्या भगवान विठ्ठल आणि त्यांच्या पंढरपुर धामाचे वर्णन करणारा विशेषांक म्हणुन प्रकाशित करण्यात आला. सुरूवातीला काही काळासाठी हे मासिक दर दोन महिन्यातुन प्रकाशित होऊ लागले परंतु नंतर लोकांची आवड पाहुन ते दर महिन्याला प्रकाशित होऊ लागले.


Visit Count #
24,46,889
© ISKCON Ravet | All Rights Reserved | SW Version 2.2